पोलीस चौकीवर धुडगूस, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 11:22 IST2018-02-19T11:21:50+5:302018-02-19T11:22:23+5:30

आझादनगर परिसर : संशयितांची धरपकड सुरु

Police fired at the police station, filed a complaint | पोलीस चौकीवर धुडगूस, गुन्हा दाखल

पोलीस चौकीवर धुडगूस, गुन्हा दाखल

ठळक मुद्देपारधी पिकेट चौकीतील थरारचौघांना घेतले ताब्यातघटनास्थळी पोलिसांकडून ‘वॉच’

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पारधी पिकेट पोलीस चौकीवर काही जणांनी धुडगूस घालत नासधूस केली़ दहशत माजविण्याचा प्रयत्न केला़ याप्रकरणी शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ३ जणांना अटक आणि एक अल्पवयीन असल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले़ 
घड्याळवाली मशिद परिसरात डिजे वाजविण्याच्या कारणावरुन दगडफेकीची घटना शुक्रवारी दुपारी घडली़ यात पारधी पिकेट पोलीस चौकीवरही दगड भिरकाविण्यात आला़ धुडगूस घालत नुकसान करण्यात आले़ यात सीसीटीव्ही कॅमेरामध्ये जे कोणी कैद झाले त्यांना उडकून काढत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़  
दरम्यान, तणाव वाढत असल्याचे कळताच उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक दत्ता पवार पोलीस फौजफाटासह घटनास्थळी दाखल झाले होते़ आता यात संशयितांची धरपकड करण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे़ 
अटकेतील संशयित
धुडगूस प्रकरणी फैय्याज अय्याज मोहम्मद जाकीर अन्सारी (१९), आसीफ अली सय्यद (१८), मोहम्मद आरील मोहम्मद सोईल अन्सारी (१८) यांना अटक करण्यात आली़ तर एका १७ वर्षाच्या अल्पयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले़ 

Web Title: Police fired at the police station, filed a complaint