केवळ संशयावरून पोलिसांची युवकाला जबर मारहाण
By Admin | Updated: February 20, 2017 00:58 IST2017-02-20T00:58:51+5:302017-02-20T00:58:51+5:30
चौकशीचे आदेश : जखमी युवक जामद्याचा

केवळ संशयावरून पोलिसांची युवकाला जबर मारहाण
नंदुरबार : कुठलीही चौकशी न करता केवळ संशयावरून एका युवकाला ताब्यात घेत शहर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत एक युवक जबर जखमी झाला. जामदा, ता.साक्री येथील राजेश शांतीलाल पवार (वय 25) असे या युवकाचे नाव आहे. या युवकाला धुळे जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची चौकशी होणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
या युवकाला शनिवारी रात्री ताब्यात घेतले गेले. युवक जबर जखमी झाल्याने घाबरलेल्या पोलिसांनी जामदाच्या सरपंचांना कळविले. त्यांनी युवकाची अवस्था पाहून त्यास ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली.