धुळ्यात तलवारीसह दोघांना पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 14:18 IST2019-08-02T14:18:16+5:302019-08-02T14:18:37+5:30
बसस्थानक परिसरातील घटना

धुळ्यात तलवारीसह दोघांना पोलिसांनी पकडले
आॅनलाइन लोकमत
धुळे : शहर बसस्थानक परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास हातात तलवार घेवून आरडाओरड करत फिरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांच्या गस्तीपथकाने अटक केली आहे़
अमावस्यानिमित्त शहर पोलिसांचे पथक बुधवारी रात्री गस्तीवर होते़ गुरुवारी पहाटे पाऊण वाजेच्या सुमारास बसस्थानकासमोरील गेटसमोर रस्त्यावर दोन जण आरडा ओरड करीत आहेत़ त्यापैकी एकाच्या हातात तलवार आहे़ अशी माहिती मिळताच गस्तीवर असणाºया पथकाने बसस्थानकाच्या दिशेने मार्गक्रमण केले़ त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात तलवारीसह आणण्यात आले़ त्यांची चौकशी केली असता सागर रविंद्र वाडेकर (२६) आणि सुभाष उर्फ सर्किट शाम काटकर (२१) (दोघे रा़ अमरनगर, मनोेहर टॉकिजसमोर, धुळे) ही दोन नावे समोर आली आहेत़ त्यांच्याकडील दोन हजार रुपये किंमतीची २ फुट ४ इंच लांबीची तलवार जप्त करण्यात आली आहे़ बेकायदा शस्त्र बाळगणाºया या दोघा संशयितांविरुध्द आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ शहर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक सारीका कोडपे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, नाना आखाडे, पोलीस कर्मचारी अब्बास शेख, योगेश चव्हाण, मुक्तार मन्सुरी, प्रल्हाद वाघ, सतिष कोठावदे, रमेश मोरे, कमलेश सूर्यवंशी, अविनाश कराड, पंकज खैरमोडे, राहुल पाटील, राहुल गिरी यांनी ही कारवाई केली़ हिरालाल बैरागी पुढील तपास करीत आहेत़