कविंनी स्वरचित काव्याने जिंकली मने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:01 PM2019-05-21T12:01:22+5:302019-05-21T12:01:56+5:30

बुद्धपौणिमेचे औचित्य : सामूहिक बुद्धवंदना, खिरदान, संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन 

The poets won by autobiography | कविंनी स्वरचित काव्याने जिंकली मने 

बुध्द पौर्णिमेनिमित्त आयोजित काव्यसंमेलनात कविसंमेलनास उपस्थित कवी

Next


धुळे : बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधून शहरात आयोजित काव्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  येथील लोक कवी कै.दिपक निकम काव्यधारा मंडळ व जिल्हा बामसेफ युनिटचे कार्यकर्ते संघरत्न नेरकर  यांच्या संयुक्त विद्यमाने संभाप्पा कॉलनी येथील संघरत्न नेरकर यांच्या निवासस्थानी हे कविसंमेलन झाले. 
सामूहिक बुद्धवंदना, खिरदान
प्रथम उपस्थित कवींनी सामुहीक बुद्ध वंदना केली. तसेच बुद्ध पौर्णिमा मंगल दिनानिमित्त याप्रसंगी उपस्थित कवी, कवयित्रींना खिरदानाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कवी शाहीर शंकर पवार, स्वप्निल नेरकर, दत्तात्रय कल्याणकर, प्रल्हाद पवार, झेड.के.पाटील, गोकुळ भामरे, राजेंद्र वाकडे, गुलाब धनजी मोरे, डॉ.श्रीकृष्ण बेडसे, अमोल कांबळे, संविधान नेरकर, साहील कुमार,  रोहन वाघ ईत्यादी उपस्थित कवींनी आपल्या स्वरचित एकापेक्षा एक सरस अश्या काव्य रचना सादर करून काव्य संमेलनात रंगत निर्माण केली तसेच उपस्थितांची दाद मिळवली. ज्येष्ठ कवी प्रा.राम जाधव यांनी आपल्या खास शैलीतून कवी संमेलनाचे सुत्रसंचालन करून कार्यक्रमात उपस्थितांची दाद मिळवली. 
या कविसंमेलनासाठी शहर तसेच जिल्हाभरातून आलेल्या कवींनी आपला सहभाग नोंदविला. संमेलना मोठा उत्साह दिसला. कविसंमेलन यशस्वीतेसाठी डॉ.श्रीकृष्ण बेडसे, धनंजय गाळणकर, प्रा.राम जाधव दत्तात्रय कल्याणकर आदी कार्यकर्त्यांनी योगदान दिले.

Web Title: The poets won by autobiography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे