पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवांनाना पंतप्रधानांची श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 17:35 IST2019-02-16T17:34:22+5:302019-02-16T17:35:18+5:30

नागरिकांनीही वाहिली श्रद्धांजली

PM's homage to martyr martyr martyr of Pulwama terror | पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवांनाना पंतप्रधानांची श्रद्धांजली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवांनाना पंतप्रधानांची श्रद्धांजली

ठळक मुद्देमोदी यांची धुळ्यात सभा होतीसभेला सुरूवात होण्यापूर्वी त्यांनी शहीद जवांनांना श्रद्धांजली अर्पण केली

आॅनलाइन लोकमत
धुळे- जम्मु-काश्मीरमधील पुलवामा येथे गुरूवारी दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना पंतप्रधानांसह राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांनी दोन मिनीटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.
विविध विकास कामांचे उदघाटनांसाठी पंतप्रधान मोदी यांची आज दुपारी मालेगाव रोडवरील गोशाळेच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धुळ्यात आगमन झाले. सभेच्या सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री तसेच उपस्थित नागरिकांनी पुलवामा हल्यात शहीद झालेल्या जवानांना दोन मिनीटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी बोलतांना नरेंद्र मोदी म्हणाले, आंतकवादी हल्यामुळे संतापाची लाट आहे. अश्रुंचा बदला घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
 

Web Title: PM's homage to martyr martyr martyr of Pulwama terror

टॅग्स :Dhuleधुळे