पंतप्रधान मोदींना १ लाख पत्रे पाठवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST2021-06-16T04:47:45+5:302021-06-16T04:47:45+5:30
धुळे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्ह्यातून १ लाख पत्रे पाठविण्याचा निर्धार ...

पंतप्रधान मोदींना १ लाख पत्रे पाठवणार
धुळे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्ह्यातून १ लाख पत्रे पाठविण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या उपक्रमात समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सुमित पवार यांनी केले आहे.
मराठा समाजाला शिक्षण क्षेत्रात, सरकारी नोकरी यामध्ये आरक्षण मिळावे यासाठी समाजाने एकत्र यावे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरक्षणाची मागणी करणारी एक लाख पत्रे पाठविणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रदेश सचिव पवार यांनी दिली. यासाठी प्रत्येक तालुक्यात पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. शिरपूर - आशिष अहिरे, शिंदखेडा - चिराग माळी, धुळे तालुका - सागर पाटील, साक्री - कल्पेश पाटील यांच्याकडे पत्रे जमा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर शहरातील जबाबदारी शहर अध्यक्ष कुणाल पवार यांच्याकडे आहे. १७ ते २० जून या कालावधीत पवनपुत्र विजय व्यायामशाळा येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या वेळी सत्यजित सिसोदे, जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे आदी उपस्थित होते.