हजयात्रेकरूंसाठी प्राधान्याने मोफत लस उपलब्ध करून दया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST2021-06-10T04:24:29+5:302021-06-10T04:24:29+5:30
धुळे शहरासह महाराष्ट्रातील भाविक मोठ्या प्रमाणात हजसाठी मक्का येथे जातात, परंतु सद्यस्थितीत कोविडमुळे सौदी अरब येथील प्रशासनाने सर्व हजयात्रेकरूंना ...

हजयात्रेकरूंसाठी प्राधान्याने मोफत लस उपलब्ध करून दया
धुळे शहरासह महाराष्ट्रातील भाविक मोठ्या प्रमाणात हजसाठी मक्का येथे जातात, परंतु सद्यस्थितीत कोविडमुळे सौदी अरब येथील प्रशासनाने सर्व हजयात्रेकरूंना लसीकरण गरजेचे केले आहे. लस न घेतलेल्या यात्रेकरूंना यात्रेसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. या अनुषंगाने यात्रेकरूंसाठी लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शहराचे आमदार फारुक शाह यांनी आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांची भेट घेऊन धुळे शहरासह महाराष्ट्रातील हजयात्रेकरूंसाठी मोफत व प्राधान्याने लस उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली.
हजयात्रेकरूंसाठी सौदी अरब येथील प्रशासनाने डब्यूएचओ संस्थेची मान्यता प्राप्त असलेली कोविशिल्ड मान्य केलेली आहे. भारतात ही लस पुरेसा लस उपलब्ध होत नाही. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली कोविशिल्ड ही लस हजयात्रेकरूंसाठी तातडीने उपलब्ध करून द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.