मतदान यंत्र फेरफार प्रकरणी चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 15:47 IST2019-01-07T15:46:07+5:302019-01-07T15:47:02+5:30
अनिल गोटे : पोलीस महासंचालकांकडे मागणी

मतदान यंत्र फेरफार प्रकरणी चौकशी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळे महापालिका निवडणूकीत मतदान यंत्रांमध्ये झालेल्या फेरफार प्रकरणाची आयपीएस अधिकाºयाच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी गृह सचिव, पोलीस महासंचालकांकडे केली आहे़ पण १० दिवस उलटूनही निर्णय झाला नसल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही, भाजपची ईव्हीएम बरोबर युती झाल्याचे विधान केले आहे़ त्यामुळे आगामी निवडणूकांमध्ये विरोधी पक्षांची कसोटी लागणार असून केवळ आरोप न करता ते सिध्द करून दाखवावेत, आपल्याकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत, असे आमदार गोटे म्हणाले़
शिवाय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एका व्यासपीठावर चर्चेस यावे, असे आव्हान देखील त्यांनी दिले़ प्रदेशाध्यक्ष दानवेंना कुणीच गांभिर्याने घेत नसून त्यांच्यापेक्षा आमचे बबन चौधरी चांगले अध्यक्ष आहेत, असे म्हणत आमदारांनी प्रदेशाध्यक्षांचाही समाचार घेतला़
तुम्हीच तब्येत सांभाळा़
गिरीश महाजन यांनी मला प्रकृती जपण्याचा सल्ला दिला़ मात्र मी शरीराचा उपयोग मर्यादित करतो, त्यामुळे ठणठणीत आहे़ तुम्हीच नियमित व्यायाम करा व तब्येत सांभाळा, असा वडिलकीचा सल्ला देत असल्याचे अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले़