शिरपूर येथे रॅलीद्वारे खेळाडूचा गौरव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:25 IST2018-11-26T23:25:15+5:302018-11-26T23:25:56+5:30

१३ व्या जागतिक अग्निशमन दलाच्या वॉटरपोलो स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त करणारा येथील कपिल शिंपी

Players' pride through a rally in Shirpur | शिरपूर येथे रॅलीद्वारे खेळाडूचा गौरव 

शिरपूर येथे रॅलीद्वारे खेळाडूचा गौरव 

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर :  दक्षिण कोरीयात झालेल्या १३ व्या जागतिक अग्निशमन दलाच्या वॉटरपोलो स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त करणारा येथील कपिल शिंपी या खेळाडूचा येथील किसान विद्या प्रसारक संस्थेकडून सवाद्य भव्य रॅली काढून गौरव करण्यात आला. 
रौप्यपदक प्राप्त कपिल मोहन शिंपी यांचा गौरव संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे, निशांत रंधे, प्राचार्य डॉ़एस़एऩपटेल, राजेंद्र बोरसे, मोहन मुरलीधर शिंपी, अर्चना शिंपी, सुभाष शिंपी, डिंगबर सोनवणे, सुरेश शिंपी, डॉफ़ुला बागुल, प्रा़प्रशांत पाटील, प्रा़माळी, मयूर बोरसे, विजेंद्र जाधव, धीरज पाटील, अमोल शिरसाठ, दीपक ढोले, आकाश बेंडवाल, भूषण पवार, भूषण बोरसे आदी उपस्थित होते़
गौरव रॅलीस ढोल-ताशांच्या गजरात संस्थेच्या कार्यालयापासून सुरूवात होवून मेनरोड मार्गाने एस़पी़डी़एम़ कॉलेजच्या प्रांगणात समारोप करण्यात आला़ रॅलीत एऩसी़सी, एऩएस़एस़ व एस़पी़डी़एम़ महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभागी झाले होते़ 

Web Title: Players' pride through a rally in Shirpur

टॅग्स :Dhuleधुळे