प्लॅटफॅार्म तिकीट ५० रुपये, तरी स्थानकावर गर्दी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST2021-03-13T05:05:23+5:302021-03-13T05:05:23+5:30
कोरोनामुळे जवळपास ८ महिने प्रवासी रेल्वेगाड्या बंदच होत्या. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने गाड्या सुरू झाल्या. पश्चिम रेल्वेच्या सुरत-भुसावळ मार्गावर सद्य:स्थितीत अनेक ...

प्लॅटफॅार्म तिकीट ५० रुपये, तरी स्थानकावर गर्दी कायम
कोरोनामुळे जवळपास ८ महिने प्रवासी रेल्वेगाड्या बंदच होत्या. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने गाड्या सुरू झाल्या. पश्चिम रेल्वेच्या सुरत-भुसावळ मार्गावर सद्य:स्थितीत अनेक प्रवासी गाड्या सुरू असल्या तरी दोंडाईचा या स्थानकावर दहाच गाड्या थांबतात. यातील बहुतांश एक्स्प्रेस गाड्या आहेत. सुरत-भुसावळ पॅसेंजर व अमरावती-सुरत पॅसेंजर गेल्या आठवड्यातच सुरू झाल्याने थोडीफार गर्दी होऊ लागली आहे. अन्यथा रेल्वे स्थानकावर शुकशुकाटच जाणवायचा.
दोंडाईचा रेल्वेस्थानक लहान आहे. काही नागरिक नातेवाइकांना सोडायला स्थानकावर येतात. यातील बहुतांश कष्टकरी, मजूर असाच वर्ग असतो. त्यांना प्लॅटफॅार्म तिकिटाचा गंधही नाही. शिवाय कारवाई झालीच तर स्थानकावरून निघून जाण्याच्या पळवाटाही भरपूर आहेत. त्यामुळे अनेक जण प्लॅटफॅार्म तिकीट काढण्याकडे दुर्लक्षच करतात. मात्र, सुशिक्षित नागरिक प्लॅटफॅार्म तिकीट घेऊनच स्थानकावर येतात.
सध्या दररोज १० प्रवासी गाड्या धावतात
पश्चिम रेल्वेच्या सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर धावणाऱ्या प्रवासी गाड्यांची संख्या जास्त असली तरी दोंडाईचा स्थानकावर १० गाड्यांना थांबा आहे. त्यात सुरत-भुसावळ पॅसेंजर, खान्देश एक्स्प्रेस, नवजीवन एक्स्प्रेस, ताप्ती-गंगा एक्स्प्रेस, अहमदाबाद-हावडा, हिसार एक्स्प्रेस, बैरोनी एक्स्प्रेसचा समावेश आहे.
साधारत: हजार ते दीड हजार प्रवासी प्रवास करतात
पश्चिम रेल्वेच्या सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर धावणाऱ्या प्रवासी गाड्यांची संख्या जास्त असली तरी दोंडाईचा स्थानकावर १० गाड्यांना थांबा आहे. त्यात सुरत-भुसावळ पॅसेंजर, खान्देश एक्स्प्रेस, नवजीवन एक्स्प्रेस, ताप्ती-गंगा एक्स्प्रेस, अहमदाबाद-हावडा, हिसार एक्स्प्रेस, बैरोनी एक्स्प्रेसचा समावेश आहे.
प्लॅटफॅार्म तिकीट विक्रीचे प्रमाण नगण्य
रेल्वेस्थानकावर प्रवाशांसोबत येणाऱ्यांसाठी प्लॅटफाॅर्म तिकीट काढणे गरजेचे असले तरी ग्रामीण भागात सरसकट प्रवाशांसोबत नागरिक येतात. प्लॅटफॅार्म तिकीट काढण्याचे प्रमाण नगण्यच आहे. गेल्या दोन दिवसांत फक्त सहा जणांनी प्लॅटफाॅर्म तिकीट काढले आहे.
कोरोनामुळे अगोदरच बेरोजगारी वाढली आहे. त्यातच रेल्वे मंत्रालयाने प्लॅटफॅार्मचे दर ५० रुपये केले आहेत. १०-१५ मिनिटांसाठी एवढे पैसे देणे अशक्य आहे. रेल्वेस्थानकावर कधीतरी यावे लागते. हे तिकीट दर कमी करावेत
- संतोष गिरासे,
प्रवासी, दोंडाईचा.
मोठ्या स्थानकावर प्लॅटफॅार्मवर येण्यासाठी तिकीट ठेवणे ठीक आहे. ग्रामीण भागात त्याची आवश्यकता नाही. अगोदरच गाड्यांची संख्या कमी आहे. त्यातच काही मिनिटांसाठी एवढे पैसे मोजणे कठीण जाते.
- भावना पाटील,
प्रवासी दोंडाईचा
रेल्वेस्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मचे तिकीट १० रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत करण्यात आलेले आहे. तिकिटाचे दर सांगितल्यावर अनेक जण तिकीट खिडकीपासून परत जातात. अनेक जण प्लॅटफॉर्म तिकीटच काढत नाहीत. गेल्या दोन दिवसांत तर फक्त सहा जणांनी प्लॅटफॅार्म तिकीट काढले आहे.
- मनोज मावलिया
स्टेशन मास्तर, दोंडाईचा.