नागेश्वर मंदिर परिसरात ५०० वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 12:42 IST2020-07-26T12:41:59+5:302020-07-26T12:42:14+5:30
शिरपूर येथे भूपेशभाई ग्रीन आर्मी, नेहरु युवा केंद्र व युवा परिषदेचा उपक्रम

dhule
सुरेश पुणतांबेकर ।
शिरपूर : तालुक्यातील नागेश्वर येथील श्रीक्षेत्र नागेश्वर संस्थान मंदिर परिसरात व डोंगरांवर भूपेशभाई ग्रीन आर्मी, नेहरू युवा केंद्र धुळे, भारतीय राष्ट्रीय युवा परिषद यांच्या संयुक्तरीतीने ५०० वृक्ष लागवड करण्यात आली.
सरकारने सुरू केलेल्या क्लीन व्हिलेज अँड ग्रीन व्हिलेज या कार्यक्रमानुसार ही वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे़ कार्यक्रमासाठी भूपेशभाई ग्रीन आर्मीचे पदाधिकारी तसेच नेहरू युवा केंद्राचे युवा मंडळ सदस्य, भारतीय युवा परिषद पदाधिकारी, पर्यावरण स्नेही, धुळे नेहरू युवा मंडळाच्या महिला सदस्य देखील उपस्थित होते.
जिल्ह्याचे पर्यावरण नियंत्रण मंडळ धुळे अध्यक्ष संजीव ढवळे, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक जितेंद्र राठोड, शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, भूपेशभाई ग्रीन आर्मीचे धिरज देशमुख, बकुल अग्निहोत्री, प्रशांत पवार, गिरीश सनेर तसेच युवा परिषदेचे ताराचंद जाधव, रोशन सोनवणे, दिनेश बंजारा, उमेश राठोड, प्रदीप राठोड, कमलेश जाधव, चेतन मुसळे, रामकृष्ण माळी, गणेश चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या समूहाने १५ हजार वृक्षारोपण करण्याचे ध्येय ठेऊन उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेनुसार भूपेशभाई ग्रीन आर्मी सोबत नियोजन केले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे असे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक जितेंद्र राठोड यांनी सांगितले. वन विभाग धुळे, नेहरू युवा केंद्र अधिकारी अशोक मेघवाल आणि नाना पाटील यांचे वृक्षारोपण बाबत मार्गदर्शन लाभले.