स्मशानभूमीत केली आंबे वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:48 PM2020-03-18T12:48:50+5:302020-03-18T12:50:03+5:30

धुलिवंदन साजरे केले इकोफ्रेन्डली : भटाणेतील कॅन डू फ्रेन्डस्मधील युवकांचा उपक्रम

Planted mango tree made in the cemetery | स्मशानभूमीत केली आंबे वृक्ष लागवड

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
तºहाडी : शिरपूर तालुक्यातील भटाणे येथे कॅन डू फ्रेन्डसमधील युवकांनी अनोख्यापद्धतीने धुलीवंदन साजरे केले.
या युवकांनी गावात दोन दिवसापूर्वी गावात मोफत शोषखड्डा मोहीम राबविण्यात आली होती. त्या शोषखड्ड्याची माती स्मशानभूमी येथे टाकली होती. येथील स्मशानभूमी परीसरात रेताड जागेवर शोषखड्ड्यातील काळ्या मातीचा वापर करून ४० आंब्यांच्या वृक्षांची लागवड करून अनोख्यापद्धतीने धुलीवंदन साजरे केले.
विषेश म्हणजे अमरधाम परिसरातील अंधश्रध्देवर मात करत महीलांनीही सहभाग नोंदविला. या अगोदर स्मशानभूमीत येथील मरण पावलेल्या स्मरणार्थ विविध प्रकारची झाडे लावली व बसण्यासाठी बाक टाकले आहेत. यामुळे स्मशानात जातांना भय वाटत नाही अशापद्धतीने स्मशानभूमीचा परिसर तयार करण्यात आली आहे. या तरुणांचे परिसरातून नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे.

Web Title: Planted mango tree made in the cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे