डोंगरावर केली ४० वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 13:22 IST2020-02-23T13:18:22+5:302020-02-23T13:22:18+5:30
किसान संघचा उपक्रम । सीसीटीव्हीत देखरेख

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : भारतीय किसान संघातर्फे खुडाणे रस्त्यावरील शिवसडे शिवारातील डोंगरावर भव्य मंडप उभारून शिवप्रतिमा पूजन आणि त्या नंतर ४० वृक्ष लागवड करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
त्या कार्यक्रमात मधुकर वाघ, दुल्लभ जाधव, डॉ.सुनिल जाधव, एन.एम. देवरे आदी मान्यवरांनी शिवचरित्रावर मनोगत व्यक्त केले. रामराव गवळे, कमलेश भामरे, सदा महाजन, कन्हैयालाल काळे, हिंमत बांगर, किशोर जाधव, सुनिल जगदाळे, छोटू जगदाळे, निलेश शहा, रवि शहा, सुशिल राणेंसह मोठ्या संख्येने ग्रसम्थ उपस्थित होते. उपस्थित शिवप्रमींच्या हस्ते मातोश्री उद्यान परिसरात चाळीस वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यायची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवून देखरेख केली जात आहे. या भारतीय किसान संघाने केलेल्या उपक्रमाचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.