खुडाणे येथे वृक्षारोपण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:24 IST2020-07-20T22:24:17+5:302020-07-20T22:24:33+5:30
संत सावता महाराज पुण्यतिथी : स्मशानभूमी व जि.प. शाळेत उपक्रम

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : साक्री तालुक्यातील खुडाणे येथे संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
रविवारी खुडाणे ग्रामपंचायत, भजनी मंडळ, महिला बचतगट व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने संत सावता महाराज पुण्यतिथी निसर्ग संवर्धन करून साजरी करण्यात आली.
खुडाणे ग्रामपंचायतीमार्फत स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारातही वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत रोपांचे वाटप करण्यात आले होते.
वृक्षारोपणप्रसंगी सरपंच प्रमिला देवरे, उपसरपंच कन्हैयालाल काळे, गटनेते शरद गवळे, शालीग्राम देवरे, पांडूरंग महाले, सामाजिक कार्यकर्ते रमेश गवळे, रमेश जगताप, मधुकर वाघ, किसान सभा धुळे जिल्हा उपाध्यक्ष दुल्लभ जाधव, आबा जगताप, मोठाभाऊ गवळे, कांतीलाल खैरनार, महिला बचतगट प्रमुख संगिता बाविस्कर, विष्णू शिंदे ग्रामपंचायत सदस्य अशोक खलाणे, गंगाधर भदाणे महेंद्र हेमाडे, महारू माळचे आदी उपास्थित होते. कोरोनामुळे विविध कार्यक्रम रद्द करुन पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.