अस्थी शेतात पुरत केले वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST2021-01-23T04:36:23+5:302021-01-23T04:36:23+5:30
भिकनराव वामन कुवर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा अंत्यविधी पारगाव येथे त्यांच्या शेतात कर्मभूमीत करण्यात आले. भिकनराव ...

अस्थी शेतात पुरत केले वृक्षारोपण
भिकनराव वामन कुवर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा अंत्यविधी पारगाव येथे त्यांच्या शेतात कर्मभूमीत करण्यात आले. भिकनराव कुवर यांच्या अस्थी या कर्मभूमीत विसर्जित करण्यात आल्या शेतीशी असलेला जिव्हाळा आणि प्रेम अपार कष्ट करून त्यांनी हे वैभव उभे केले होते, ते राजकीय सामाजिक व कृषी क्षेत्रात कार्यरत होते, बल्हाणे गावाचे सरपंच, वि.का.स.सोसायटीचे चेअरमन, साक्री शेतकी संघाचे प्रेसिडेंट होते, वडिलांचे शेतीविषयीचे प्रेम व वडिलांची छत्रछाया कुटुंबातील सर्व सदस्यांना मिळत राहील, या भावनेने कुवर परिवारातील अनिल कुवर, देविदास कुवर, अशोक कुवर, जयप्रकाश कुवर, संध्या कुवर, आशा कुवर, कल्पना कुवर यांनी त्यांच्या अस्थी शेतात पुरीत विसर्जित करून वृक्षारोपण केले.