बोरसे हायस्कूलमध्ये वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 11:39 IST2019-08-01T11:38:53+5:302019-08-01T11:39:13+5:30
धुळे : तालुक्यातील कापडणे येथील एच.एस. बोरसे हायस्कूल येथे वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली. ...

वृक्षारोपण करतांना संतोष पाटील, आऱए़ पाटील, प्रेमकुमार अहिरे, भुपेंद्र तावडे, चंद्रशेखर माळी, शिक्षक व विद्यार्थिनी.
धुळे : तालुक्यातील कापडणे येथील एच.एस. बोरसे हायस्कूल येथे वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली.
निसर्गमित्र समितीचे राज्य सचिव संतोष पाटील यांनी वृक्षाचे फायदे व महत्व याविषयी मार्गदर्शन केले़ यावेळी पर्यावरणावर आधारित वृक्ष संवर्धनाची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच एक विद्यार्थी व एक वृक्ष लागवड करण्याचा संकल्प विद्यालयाने केला. अध्यक्षस्थानी बोरसे हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.ए. पाटील होते. प्रमुख पाहुणे निसर्गमित्र समितीचे राज्य सचिव संतोष पाटील, निसर्गमित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, भुपेंद्र तावडे, शिक्षक, माता-पालक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर माळी, नगाव शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे अंतरवासीता शिक्षक व बोरसे हायस्कूलचे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किशोर बोरसे यांनी केले.