महिला दिनानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 12:59 IST2020-03-11T12:59:27+5:302020-03-11T12:59:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटनांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ...

In-place events for Women's Day | महिला दिनानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रम

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटनांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
निमगुळ ग्रा.पं.त महिलांचा सत्कार
निमगुळ- येथील ग्रामपंचायत कार्यालयात गावातील ५० महिलांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. औरंगाबाद येथील बेटी बचाव, बेटी पढाव अभियानाच्या अध्यक्षा मृणाली बागल यांनी हा सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. सदस्या भागाबाई भिल होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, उपसरपंच सुपाबाई साळवे, ग्रा.पं. सदस्या रेखा बागल उपस्थित होत्या. सूत्रसंचलन वैशाली बागल यांनी केले. कार्यक्रमासाठी माजी उपसरपंच कल्याण बागल, ऋषीकेश बागल, निलेश शिरसाठ, समाधान बागल, सिद्धेश्वर बागल, बाळा पाटील यांनी सहकार्य केले.
आदर्श कला महाविद्यालय
साक्री- निजामपूर-जैताणे येथील आदर्श कला महाविद्यालयात महिला दिनानिमित्त ‘माझी आई माझे महाविद्यालय’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अशोक खैरनार होते. प्रमुख अतिथी म्हणून किरण खैरनार, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.कांतिलाल सोनवणे, अनिल राणे आदी उपस्थित होते. डॉ.कांतिलाल सोनवणे यांनी यांनी स्री शक्ती सामर्थ्याचे महत्व आणि योगदान या विषयावर विचार मांडले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समन्वयक डॉ.प्रियंका सुलाखे यांनी केले. कार्यक्रमास प्रा.यशवंत कुळकर्णी, प्रा.अजबराव इंगळे, प्रा.सुनील राजपूत आदी उपस्थित होते.
चिमठाणे येथे गौरव सोहळा
चिमठाणे- भडणे येथील जिजाबाई दिलीप पाटील यांनी दोन्ही मुलांना अधिकारी घडवले. महिला दिनानिमित्त ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करुन कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील, भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी आदी उपस्थित होते.
कापडणे जि.प. केंद्रशाळा
कापडणे- येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नं.१ मध्ये महिलादिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका भाग्यश्री भामरे होत्या. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील उपशिक्षिका ज्योत्स्ना पाटील यांनी महिला दिनाबाबत माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मंगला पाटील, दिपा पिंगळे, कल्पना भामरे, अर्चना वाणी, रामराव पाटील आदी उपस्थित होते. आभार कल्पना भामरे यांनी मानले.
राष्टÑसेवादलातर्फे महिला मेळावा
धुळे- येथील राष्ट्र सेवादल धुळे महानगर व सेनाजी महिला पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी सभासदांच्या सहयोगाने वाचनालयाचे लोकार्पणही करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्र सेवादलाचे पुर्व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.अरविंद कपोले, कार्याध्यक्ष अनिल देवपुरकर, त्रिवेणी सोनवणे, लेखापरिक्षक वंदना सैतवाल, संस्थेचे चेअरमन विजय महाले, व्हा.चेअरमन अनिल सैंदाणे, बापु ठाकुर आदी उपस्थित होते. महिलांना पुष्पगुच्छ व ‘श्यामची आई’ पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक विजय महाले यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक गुलाबराव सैंदाणे, माया सैंदाणे यांनी त्यांच्याकडे असलेली पुस्तके संस्थेस सुपुर्द केली. त्याबद्दल त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी सेनाजी पतसंस्थेचे संचालक लोटन पवार, विलास बोरसे, रमेश पगारे, अशोक खोंडे, भावना सोनवणे, धनश्री महाले, प्रमिला देवरे, मालती सोनवणे, माया महाले, जगदिश अहिरराव, सुमन ठाकुर आदी उपस्थित होते.
दोंडाईचा रोटरी स्कूल
दोंडाईचा- येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी शारदा शाह होत्या. प्रमुख अतिथी म्हणून दिशा शाह, पौर्णिमा शाह उपस्थित होत्या. प्राचार्य एम.पी. पवार, हेतल शाह, प्राजक्ता शाह, डॉ.युतिका भामरे, डॉ.रुचिता पाटील, प्राजक्ता शिंदे, ज्योती पवार आदी उपस्थित होते. यावेळी महिला पालकांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमासाठी पूजा गिरासे, अंजना राजपूत, अनिता शिंदे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ललिता गिरासे व रत्नप्रभा ढोले यांनी केले. आभार सुवर्णा महाजन यांनी मानले.

Web Title: In-place events for Women's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे