पिंपळनेर शंभर टक्के लॉकडाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 22:02 IST2020-04-10T22:01:30+5:302020-04-10T22:02:13+5:30
कोरोना दाराशी : सामोड्यातही कडकडीत बंदचा निर्णय

dhule
पिंपळनेर : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे़ शेजारच्या मालेगाव आणि सेधव्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत़ कोरोना दाराशी आला आहे़
अशा भयावह परिस्थितीतही नागरीक नियम पाळत नसल्याने धोका वाढला आहे़ त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत पाच दिवस पिंपळनेर आणि सामोडे येथे शंभर टक्के लॉकडाउनचा निर्णय ग्रामस्तरीय समितीने घेतला आहे़ त्यामुळे सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे़
पिंपळनेर व सामोडे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील या सर्वांची पिंपळनेर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गुरूवारी संयुक्त बैठक झाली़ या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़
पिंपळनेर ३५ ते ४० हजार लोकवस्तीचे गाव आहे़ सामोडे ग्रामपंचायतीचा काही भाग असल्याने त्यांची लोकसंख्या आठ ते दहा हजार आहे़ नागरिकांना वेळोवेळी सूचना देऊन देखील ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र होते़