पिंपळनेर येथे भाजी विक्रेत्याला मारहाण
By Admin | Updated: June 16, 2017 15:07 IST2017-06-16T15:07:11+5:302017-06-16T15:07:11+5:30
सटाणा रोडवरील घटना : सहा जणांविरूध्द गुन्हा

पिंपळनेर येथे भाजी विक्रेत्याला मारहाण
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.16- साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे कारण नसताना सहा जणांनी आंबे विक्रेत्याला बेदम मारहाण करून जखमी केल़े बुधवारी सायंकाळी ही घटना घडली़
जीवन रमेश क्षीरसागर (रा़ गोपाळनगर, ¨पंपळनेर) असे त्याचे नाव आह़े तो बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सटाणा रोडवरील स्टेट बँकेसमोर रस्त्यावर आंबे विक्री करीत असताना कारण नसताना अशोक गवळी, चंद्रकांत अशोक गवांदे, नंदकिशोर अशोक गवांदे, हर्षल अशोक गवळी, दादू (पूर्ण नाव, गाव माहीत नाही), रोहित गवळी (सर्व रा़ पिंपळनेर) यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. जीवन क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.