Pimpalner seized timber from forest work | पिंपळनेर वनकर्मचाºयांकडून सागाचे लाकूड जप्त
पिंपळनेर वनकर्मचाºयांकडून सागाचे लाकूड जप्त

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील वार्सा रस्त्यावर रात्री गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या कर्मचा-यांनी शुक्रवारी सकाळी सागवानी लाकडाची तस्करी करताना एक मोटारसायकल व सागवानी लाकूड पकडले. पकडलेला मुद्देमाल हा ४० हजार रुपयांचा आहे़  
घटनेनंतर चोरटे मोटारसायकलीवर स्वार होऊन पसार झाले आहे. साक्री तालुक्यातील आंबापाडा गावानजीक ही कारवाई केली. या महिन्यातील ही तिसरी कारवाई आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर - वार्सा स्त्यावरील आंबापाडा गावानजीक वनक्षेत्रपाल अरुण माळके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भूषण वाघ, वनरक्षक दीपक भोई, योगेश भिल, वनरक्षक गुलाब बारीस हे गस्त घालत असताना समोरुन संशयास्पद दुचाकी वाहन येतांना दिसले. दबा धरून बसलेल्या वनकर्मचारी यांनी त्या दुचाकीचा पाठलाग केला असता दुचाकी स्वार दुचाकी सोडून पळून जाण्यात यशस्वी झालेत़ वन कर्मचाºयांनी एमएच १८ ओ ५८३५ क्रमांकाची २० हजार रुपये किंमतीची आणि चार सागवानी चौपट नग किंमत २० हजार रुपये असा एकूण चाळीस हजाराचा मुद्देमाल वनपाल वाघ व वनरक्षकांनी ताब्यात घेतला आहे़ पळून जाणाºया चोरट्यांचा शोध घेतला जात आहे़ 
दरम्यान, मोठ्या प्रमाणावर होणाºया वृक्षतोडीकडे वन कर्मचाºयांनी लक्ष देवून कारवाई करण्याची मागणी होत आहे़ 

Web Title: Pimpalner seized timber from forest work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.