पिंपळनेर पोलिसांनी रोखली मांडूळ तस्करी

By Admin | Updated: July 10, 2017 15:47 IST2017-07-10T15:47:19+5:302017-07-10T15:47:19+5:30

मांडूळ जातीच्या सापाची तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे.

Pimpalner police prevented them from smuggling | पिंपळनेर पोलिसांनी रोखली मांडूळ तस्करी

पिंपळनेर पोलिसांनी रोखली मांडूळ तस्करी

ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.10- मांडूळ जातीच्या सापाची तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आह़े 
रविवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास एमएच 19 एएक्स  4311 क्रमांकाची कार पिंपळनेर टोल नाक्याजवळ येताच कारची तपासणी करण्यात आली़  कारमधून मांडळू साप सापडला. हा साप  सटाणा जि़ नाशिककडे  घेवून जात असल्याचे आढळून आल़े याप्रकरणी जावेद खान हसन खान पिंजारी, शकील मुश्ताक पिंजारी, पवनकुमार अवधप्रसाद पिंजारी आणि वासू देवराम तडवी (सर्व रा़ तळोदा जि़ नंदुरबार) यांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आह़े मांडूळ साप हा पिंपळनेर वन विभागातील अधिका:यांकडे सुपूर्द केल़े ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भाबड, ललित पाटील, भुषण वाघ, पंकज वाघ यांनी केली़

Web Title: Pimpalner police prevented them from smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.