धुळे मनपा आयुक्तांच्या निवासस्थानावर दगडफेक

By Admin | Updated: May 20, 2017 15:59 IST2017-05-20T15:59:46+5:302017-05-20T15:59:46+5:30

अज्ञात चार ते पाच जणांनी ही दगडफेक केली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला

Picketing at Dhule Municipal Commissioner's residence | धुळे मनपा आयुक्तांच्या निवासस्थानावर दगडफेक

धुळे मनपा आयुक्तांच्या निवासस्थानावर दगडफेक

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 20 - धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांच्या मयूर उद्यानातील निवासस्थानावर शुक्रवारी मध्यरात्री  दगडफेक झाली़ अज्ञात चार ते पाच जणांनी ही दगडफेक केली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला असून याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
जयहिंद रस्त्यावर असलेल्या मयूर कॉलनी परिसरातील उद्यानात महापालिका आयुक्तांचे निवासस्थान आह़े आयुक्त घरी असताना रात्री  अज्ञात चार ते पाच जणांनी आयुक्तांच्या निवासस्थानावर दगडफेक केली व पसार झाल़े हा प्रकार लक्षात येताच त्यावेळी डय़ुटीवर असलेले पोलीस  व वॉचमनने निवासस्थानाच्या परिसराची पाहणी केली, मात्र कोणीही दिसून आले नाही़ सकाळी आयुक्तांनी या घटनेची माहिती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे व मुख्यमंत्री कार्यालयाला दिली़ त्यानंतर वॉचमन, पोलीस कॉन्स्टेबल, मनपा सहायक आयुक्त  अनुप डुरे, अभियंता कैलास शिंदे यांनी देवपूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: Picketing at Dhule Municipal Commissioner's residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.