जिल्हा बँकेचे एटीएम नसल्याने फिरफिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 13:24 IST2020-06-15T13:23:39+5:302020-06-15T13:24:07+5:30
थाळनेर शिवार : शेतकरी चिंताग्रस्त

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे धुळे - नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम मशिन नसल्याने शेतकऱ्यांची फिर फिर होत आहे.
विविध सहकारी सोसायटी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पिक कर्ज हे धुळे - नंदुबार जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतकºयांना दिले जाते. सदर कर्जाची रक्कम किसान क्रेडिट कार्डने एटीएम मशिनद्वारेच काढावी लागते. त्यामुळे संबंधित बँकेने शेतकºयांना एटीएम कार्ड देखील पुरविले आहेत. परंतु थाळनेर गावात सेन्ट्रल बँकेचे एटीएम असल्यामुळे या ठिकाणी धुळे - नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयाने थाळनेर येथे एटीएम मशीन बसविले नसल्यामुळे थाळनेर, मांजरोद, भोरटेक, जापोरा, येथील जवळपास ३०० शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकºयांना खरीप कर्जाची रक्कम काढण्यासाठी शिरपूर किंवा होळनांथे येथे जावे लागत आहे. सध्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर कंटेन्मेंट झोनमध्ये येत आहे. त्यामुळे शहरातील व्यवहार दुपारी दोन नंतर ठप्प केलेले आहेत. त्यामुळे शेतकºयांना एटीएम मशीनद्वारे पैसे काढण्यासाठी अडचणींच्या सामना करावा लागत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने एटीएम उभारणे गरजेचे आहे किंवा पर्यायी व्यवस्था म्हणून शॉप मशीन देणे आवश्यक आहे.