वेगवेगळ्या घटनेत तीन विवाहितांचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST2021-07-01T04:24:44+5:302021-07-01T04:24:44+5:30
धुळे : जिल्ह्यातील माहेर असलेल्या तीन विवाहितांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये पैशांसाठी छळ केल्याच्या घटना घडल्या असून या विवाहितांच्या सासरच्या ...

वेगवेगळ्या घटनेत तीन विवाहितांचा छळ
धुळे : जिल्ह्यातील माहेर असलेल्या तीन विवाहितांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये पैशांसाठी छळ केल्याच्या घटना घडल्या असून या विवाहितांच्या सासरच्या १९ लोकांविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
मुलबाळ होत नसल्याने आैषधोपचारासाठी माहेरुन ६ लाख रुपये आणले नाहीत म्हणून शितल नितीन जाधव (३३, रा. रेहरुनगर, कुर्ला, मुंबई, ह. मु. राजदीप सोसायटी बायपास हायवे धुळे) या विवाहितेचा मुंबई येथे सासरी मारहाण, शिवीगाळ करुन शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात आला. १० फेब्रुवारी २०१९ रोजी लग्न झाल्यापासून छळ सुरु होता, अशी फिर्याद या विवाहितेने दिली आहे. त्यानुसार तिचा पती नितीन गंगाधर जाधव, गंगाधर पुंजू जाधव, सुमनबाई गंगाधर जाधव, संतोष गंगाधर जाधव, प्रेरणा गंगाधर जाधव (सर्व रा. कुर्ला मुंबई) यांच्याविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड काॅन्स्टेबल मोरे करीत आहेत.
दरम्यान, मोहाडी उपनगरातील माहेर असलेल्या कल्पना दीपक केंदाळे (३०) या विवाहीतेचा देखील पैशांसाठी छळ झाला आहे. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी लग्न झाल्याच्या सहा महिन्यानंतर पैशांचा तगादा लावत मारहाण, शिवीगाळ करीत शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात आला. या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पती दीपक हरिचंद्र केंदाळे, त्र्यंबक सदाशिव मरसाळे, सुनिता रामदास मरसाळे, रा. कल्याण, रत्ना रमेश डोलारे, मंदा त्र्यंबक मरसाळे, सुनंदा रामदास मरसाळे, अनिता सावंत (सर्व रा. उल्हासनगर) यांच्याविरुध्द मंगळवारी मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक गहीवड करीत आहेत.
तसेच साक्री तालुक्यातील भामेर येथील माहेर असलेल्या सुरेखा गणेश जाधव (२१) या विवाहितेचा भसवाडा, ता. पानसेमल, जि. बडवाणी मध्यप्रदेश येथे सासरी किरकोळ कारणावरुन शिवीगाळ, मारहाण करीत शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात आला. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पती गणेश भाईदास जाधव, भाईदास नामदेव जाधव, प्रमिलाबाई भाईदास जाधव, राकेश भाईदास जाधव, विद्या राकेश जाधव (सर्व रा. मध्यप्रदेश), मालुबाई ईश्वर महाजन, ईश्वर गोरख महाजन दोघे रा. पानसेलमल यांच्याविरुध्द निजामपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८(अ) , ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक ए. पी. कांगणकर करीत आहेत.