आधार नोंदणी सुरू करण्यास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:45 IST2020-06-18T21:44:40+5:302020-06-18T21:45:03+5:30
जिल्हाधिकारी : प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन न केल्यास होणार कठोर कारवाई

dhule
धुळे : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या निदेर्शानुसार आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या अटी व शर्तीवर धुळे जिल्ह्यातील सर्व आधार नोंदणी केंद्र बुधवारपासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष संजय यादव यांनी दिले आहेत.
कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या आधार केंद्र चालकांचे केंद्र निलंबित करून त्यांच्याविरुद्ध आपत्ती कायद्याच्या तरतुदी अंतर्गत कारवाई होईल, असेही या आदेशात नमूद आहे. नागरिकांनी गर्दी न करता कोरोना प्रतिबंध सुरक्षेबाबत काळजी घेऊन, नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ मार्चपासून सर्व आधार नोंदणी केंद्र बंद करण्यात आले होते. सद्य:परिस्थितीत नागरिकांना त्यांच्या विविध व्यवहारांसाठी आधार सेवेची असलेली गरज विचारात घेवून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने २८ एप्रिल रोजी दिलेल्या निर्देशानुसार आधार केंद्र सुरू करताना कोरोना विषाणुचे संसर्ग रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना आधार केंद्र चालकांनी करण्याच्या अटी शर्तीवर आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात येत आहेत.
आधार केंद्रात काम करताना आॅपरेटरने येणºया व्यक्तीचे नाक, तोंड व डोळ्यांना स्पर्श होणार नाही याची दक्षता घ्यावी. आधार केंद्रातील आॅपरेटर व येणाºया नागरिकांनी पूर्णवेळ तोंडाला मास्क वापरणे आवश्यक राहील. आधार केंद्रात येणाºया प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे. प्रत्येक आधार नोंदणी, अद्ययावत झाल्यानंतर आॅपरेटरने बायोमेट्रिक व आयरिज संबंधित उपकरणांचे निजंर्तुकीकरण करावे. शारीरिक अंतर निश्चितीसाठी योग्य अंतरासह उभे राहणे किंवा मोकळ्या हवेत बसण्यासाठी प्रोत्सहित करीत बसण्यासाठीची व्यवस्था स्वखचार्ने करणे आवश्यक राहील.
आधार केंद्रावरील आॅपरेटरांनी कोविड-१९ च्या कन्टेन्मेन्ट भागातून प्रवास न करणे, आधार केंद्राचा भाग किंवा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट झाल्यास, अशा गावातील, भागातील केंद्र सुरू न करणे व भविष्यात प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाल्यावर तत्काळ बंद करुन प्रतिबंधित क्षेत्र खुले होईपर्यंत बंद ठेवावे. आधार केंद्रावर केवळ छायाचित्र (फोटो) काढण्याच्या वेळेस मास्क काढण्याची परवानगी राहील. आधार केंद्र व्यवस्थापक टेबल व आॅपरेटरच्या खुर्ची दरम्यान किमान पाच फुटांचे शारीरिक अंतर ठेवावे. गर्दी टाळण्यासाठी आधार केंद्रात कोणालाही परवानगीशिवाय प्रवेश देवू नये. जिल्हाबंदी असल्याने धुळे जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यातील आधार नोंदणी व अपडेशन करू नये.
यापैकी कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आधार केंद्र चालक किंवा आॅपरेटर यांनी उपरोक्त आदेशाचे पालन न करणारी व्यक्ती अथवा संस्था म्हणून शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल. तसेच त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच संबंधित आधार केंद्र निलंबित करण्यात येईल. वरील निदेर्शानुसार सर्व संबंधितांनी तत्काळ कार्यवाही करावी.
तहसीलदारांनी त्यांच्या अधिनस्त आधार केंद्र चालकांवर नियंत्रण ठेवून वरील निर्देर्शांचे अनुपालन होत असल्याची वेळोवेळी खात्री करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़
्रप्रतिबंधात्मक उपाययोजना बंधनकारक
सर्व आधार नोंदणी केंद्रातील सामग्री, उपकरणे प्रत्येक व्यक्तीच्या भेटीनंतर निजंर्तुकीकरण करावे. आधार नोंदणी केंद्र परिसराचे दर तीन तासांनी निजंर्तुकीकरण करावे. आधार केंद्रातील केंद्र चालक व आॅपरेटर यांनी स्वच्छता विषयक सर्व नियमांचे पालन करावे. मास्क लावणे, वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे़ आधार केंद्राबाहेर हात स्वच्छ धुण्याकरीता साबण, पाणी व सॅनिटाईझरची सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, कफ, श्वासोच्छवासाच्या अडचणी अशी लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तींनी केंद्रात येवू नये.