योगदानाशिवाय कामगिरी अशक्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:51 IST2020-06-01T21:50:39+5:302020-06-01T21:51:02+5:30
मृदुला द्रविड : निवृत्तीनिमित्त झाला सत्कार

योगदानाशिवाय कामगिरी अशक्यच
धुळे : यशस्वी कामगिरी करताना सर्वांचे योगदान आवश्यक असते़ सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील सर्वांनी आपल्या परीने योगदान दिल्याने चांगली सेवा करणे शक्य झाले़ यापुढेही यशाचा आलेख वाढता राहील, यासाठी कार्यरत राहावे, असे प्रतिपादन येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविदयालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. मृदुला द्रवीड यांनी केले.
डॉ. द्रवीड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त महाविद्यालयात सत्कार समारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. निवृत्त अधिष्ठाता डॉ. नंदकुमार द्रवीड, डॉ. ए. डब्ल्यू. पाटील, डॉ. एच. आर. अडचित्रे, डॉ. सुप्रीया मालवी, डॉ. माधुरी सुर्यवंशी, डॉ. रवीदास वसावे आदी उपस्थित होते.
डॉ. द्रवीड यांनी सांगितले, की त्यांच्या कार्यकाळात विभागासह अनेक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्या़ विभागातील प्रयोगशाळेस आयएसओ मानांकनाचा दर्जाही प्राप्त झाला असून तो सातत्याने कायम आहे. पदावर कार्यरत नसले तरी कर्मचाऱ्यासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी नेहमीच तत्पर राहणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. डॉ. नंदकुमार द्रवीड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ किशोर पाटील, अनिल यादव, प्रल्हाद पितृभक्त, राहुल खैरनार, योगेश सोनवणे, संगीता भामरे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ अनिल जोशी यांनी सुत्रसंचालन केले. सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजीज पिंजारी, सुहासिनी गावीत, समुपदेशक बी. एम. पाटील, हर्ष बडगुजर, लिलाश्री नेरकर, सोनीया भामरे, तुषार महाजन, वृषाली भामरे, भार्गव दीक्षित, मनीषा डवरे, प्रतिभा पाटील, आर. ए. पाटील, संदीप कंडारे, कैलास पुलपगारे यांनी नियोजन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. द्रवीड यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार झाला. महाविद्यालयातील अन्य विभागातर्फेही डॉ. मृदुला द्रवीड यांचा सत्कार करण्यात आला़