कल्याण निधीत वाढ करून पेन्शन याेजना लागू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST2021-02-17T04:42:39+5:302021-02-17T04:42:39+5:30
बँकेच्या व्याजदरात घट झाल्याने कल्याण निधीच्या मुदत ठेवीवरील व्याजाच्या रकमेत घट झाली आहे तसेच अनेकांना सन्मान योजनेचा लाभ दिला ...

कल्याण निधीत वाढ करून पेन्शन याेजना लागू करावी
बँकेच्या व्याजदरात घट झाल्याने कल्याण निधीच्या मुदत ठेवीवरील व्याजाच्या रकमेत घट झाली आहे तसेच अनेकांना सन्मान योजनेचा लाभ दिला जात नाही. पत्रकार कल्याण निधीत सरकारने २५ काेटी रुपये ठेवले आहेत. ही रक्कम वाढवून ५० काेटी करावी. याबाबत अधिवेशनात निर्णय न घेतल्यास आंदाेलन करण्यात येईल. पेन्शन याेजनेच्या जाचक अटीमुळे या याेजनेपासून पत्रकार वंचित आहे. त्यामुळे या योजनेसाठी वयाची मर्यादा ५८ वर्षे करावी. अनुभवाचा कालावधी २५ वर्षे करावा. अधिस्वीकृतीधारक पत्रकार योजनेसाठी पात्र असताना त्यांना सन्मान याेजनेचा लाभ नाकारला जातो. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे. शंकरराव चव्हाण कल्याण निधीसह पत्रकारांच्या सर्वच समित्यांची मुदत संपून तीन वर्षे झाली. त्यानंतरही ६ समित्या स्थापन झाल्या नाही. हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जाेशी, काेषाध्यक्ष विजय जाेशी आदींसह मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.