आर्वीजवळ चारचाकी वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 21:15 IST2019-11-09T21:15:39+5:302019-11-09T21:15:56+5:30
चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

आर्वीजवळ चारचाकी वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
आॅनलाइन लोकमत
धुळे : भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना मुंबई-आग्रा रोडवरील आर्वी शिवारात ८ नोव्हेंबर रोजी १० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारचाकी वाहन (क्र.एमएच ३०-एबी ००२८) हे भरधाव वेगाने धुळ्याकडून मालेगावकडे जात होते. त्याचवेळी आर्वी शिवारात पायी जाणाºया राजकुमार राधेशाम शर्मा (वय २६, रा. पहाडपूर, जिल्हा कानपूर,उत्तर प्रदेश) यास या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत शर्मा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
अपघात होताच चालक वाहन सोडून फरार झाला.याप्रकरणी राधेशाम रामप्रसाद ठाकूर (वय ४० ,रा. बोहसाना, जि.कानपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस स्टेशनला चालकाविरूद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल जाधव करीत आहे.