वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST2021-01-21T04:32:34+5:302021-01-21T04:32:34+5:30
दुचाकीची चोरी धुळे: शहरातील मालेगाव रोडवरून अज्ञात चोरट्याने १७ रोजी रात्री ११.३० ते १८ रोजीच्या सकाळी ६ वाजेच्या ...

वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी
दुचाकीची चोरी
धुळे: शहरातील मालेगाव रोडवरून अज्ञात चोरट्याने १७ रोजी रात्री ११.३० ते १८ रोजीच्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान २० हजार रूपये किमतीची दुचाकी (क्र.एमएच १५-एफएस ८३२६) चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी भूषण बागुल यांनी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक पी.बी. नंदाळे करीत आहेत.
विवाहितेला मारहाण
धुळे : साक्री तालुक्यातील निजामपूर येथे विवाहितेस पतीने दारूच्या नशेत मारहाण केली. तर सासूने शिवीगाळ करून चापटांनी मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विवाहिता सरला उर्फ सोनल शरद महाले (रा.लामकानी) हिने दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलीस स्टेशनला पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत.