दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:38 IST2021-03-09T04:38:27+5:302021-03-09T04:38:27+5:30
शहरातील साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या गेटसमोरून सेंट्रिंग काम करणारे आनंद दौलत पाटील (४९, रा. भीमनगर, साक्री रोड) हे जात ...

दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी
शहरातील साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या गेटसमोरून सेंट्रिंग काम करणारे आनंद दौलत पाटील (४९, रा. भीमनगर, साक्री रोड) हे जात असताना (एमएच १८ बीक्यू ६६६१ क्रमांकाच्या) दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने येत जोरदार धडक दिली. अपघाताची ही घटना ४ मार्चला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या पाटील यांना उचलण्यासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. गर्दीचा फायदा घेऊन दुचाकीचालक घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी ठरला. जखमी अवस्थेत पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ७ मार्च रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास फिर्याद दाखल करण्यात आल्याने फरार दुचाकीचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक पोलीस उपनिरीक्षक सोनवणे घटनेचा तपास करत आहेत.