पेढे चोरणाºयास रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:52 IST2017-07-22T00:52:52+5:302017-07-22T00:52:52+5:30

साक्री रोडवरील घटना : डेअरी मालकानेच पोलिसांना कळविले

Pedestrian caught up with the thieves | पेढे चोरणाºयास रंगेहाथ पकडले

पेढे चोरणाºयास रंगेहाथ पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील साक्री रोडवर डेअरीचे शटर उचकावून चोरी करणाºया चोरट्याला मालकानेच मोठ्या शिताफीने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले़ विशेष म्हणजे गल्ल्यातील रोख रकमेसह त्याने पेढेही लंपास करण्याचा प्रयत्न केला होता़
साक्री रोडवर गणेश कॉलनीच्या वळणावर माणिक गवळी यांची सुलक्ष्मी नावाची दुधाची डेअरी आहे़ गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे डेअरी बंद करून गवळी हे घरी आले होते़
दुकानात आढळला चोरटा
 ते डेअरी उघडण्यासाठी शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आले असता, डेअरीचे शटर अर्धवट उघडल्याचे त्यांना आढळून आले़ त्यांनी आतमध्ये डोकावून पाहिले असता, त्यांना चोरटा चोरी करताना आढळून आला़ या तरुणाला गवळी यांनी मोठ्या शिताफीने पकडले़ 
या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीसही दाखल झाले़ ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव कल्ल्या असे आहे़ डेअरी मालक गवळी यांच्या म्हणण्यानुसार गल्ल्यातील ५ हजार रुपयांसह डेअरीतील पेढेही लंपास करण्यात आले आहेत़ या वेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Pedestrian caught up with the thieves