वाघाडी शिवारात मोर बेशुद्ध अवस्थेत आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 21:58 IST2019-07-26T21:58:19+5:302019-07-26T21:58:37+5:30

धुळे तालुका : सोनगीर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात वन विभागातर्फे उपचार सुरु

Peacocks were found unconscious in Waghadi Shivar | वाघाडी शिवारात मोर बेशुद्ध अवस्थेत आढळले

वाघाडी शिवारात मोर बेशुद्ध अवस्थेत आढळले

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनगीर : शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी वनक्षेत्रात काहीतरी विषारी पदार्थ सेवन केल्याने मोर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. वन विभागाच्या कर्मचाºयांनी त्याला उपचारार्थ सोनगीर पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मोर पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी शिवारातील वनविभागाच्या परिसरात वन मजूर मधुकर जाधव हे गस्त घालत असतांना शुक्रवारी दुपारी काहीतरी विषारी पदार्थच सेवन केल्याने मोर  बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.  त्यांनी ही माहिती त्वरित वन विभागाच्या अधिकाºयांना कळविली.घटनेची माहिती  मिळताच  वनरक्षक भरत बोरसे, वन मजूर रतीलाल कोळी, सुकदेव बागुल यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मोर  या पक्षीला उपचारार्थ तातडीने  सोनगीर येथील पशुवैद्यकिय रुग्णालयात दाखल केले.याठिकाणी तातडीने मोरावर उपचाराला सुरवात झाली. काही वेळेनंतर मोराला शुद्ध आली. त्यानंतर वन अधिकाºयांनी मोर या पक्षाला वनक्षेत्र कार्यालयात ठेवले आहे. याठिकाणी त्याची देखभाल केली जात आहे. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर   त्या मोरला परत डांगुर्णे शिवारातील वन क्षेत्रात सोडून देण्यात येईल, अशी माहिती वनरक्षक भरत बोरसे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
 दोन दिवसाआधी देखील सरवड शिवारातील शेतातील विहीरीत मोर पडून जखमी झालेल्या अवस्थेत  आढळून आला होता.  त्याला देखील किरकोळ दुखापत झाली होती. दोन दिवस त्याच्यावर प्राथमिक उपचार  केल्यानंतर तिसºया दिवशी त्या मोर ला पुन्हा डांगुर्णे येथील वन क्षेत्रात  सोडून देण्यात येईल, अशी माहितीही  वनरक्षक भरत बोरसे यानी सांगितले.

Web Title: Peacocks were found unconscious in Waghadi Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे