कर्ले, सुराय, परसोळे येथे शांततेत मतदान, वाॅर्डनिहाय मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST2021-01-17T04:31:03+5:302021-01-17T04:31:03+5:30
कर्ले ग्रामपंचायतीसाठी देखील अकरा जागा असून चार वाॅर्डातून स्वतंत्र चार बुथवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. येथे २२ उमेदवारांचे भवितव्य ...

कर्ले, सुराय, परसोळे येथे शांततेत मतदान, वाॅर्डनिहाय मतदान
कर्ले ग्रामपंचायतीसाठी देखील अकरा जागा असून चार वाॅर्डातून स्वतंत्र चार बुथवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. येथे २२ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. एकूण २ हजार ७७९ मतदारांपैकी २ हजार ९१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. येथे ७३.२७ टक्के मतदानाची नोंद झाली.
परसोळे ही शिंदखेडा तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीवरील शेवटची व सर्वात लहान ग्रामपंचायत असून सात जागा आहेत. यासाठी १४ उमेदवार रिंगणात होते. तीन बुथवर ७५६ मतदारांनी हक्क बजावला असून एकूण ८७० मतदार मतदान यादीवर होते. येथे ८७.१० टक्के मतदान झाले.
काही किरकोळ वाद वगळता ही संपूर्ण मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. यासाठी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त दिसून आला. सोमवारी काय निकाल लागतो, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कर्ले...... वाॅर्ड क्रमांक... एक... ६७९ पैकी ५६२ मतदान झाले.
वाॅर्ड क्रमांक... दोन.... ८५०.पैकी..५५२.
वाॅर्ड क्रमांक... तीन...... ५७०...पैकी ४५६.
वाॅर्ड क्रमांक चार.... ६४०...पैकी ५२१..मतदान झाले.
परसोळे..... वार्ड क्रमांक. एक...३८८.पैकी ३३१.
वाॅर्ड क्रमांक दोन.. २८२..पैकी २५१..
वाॅर्ड क्रमांक तीन. २००..पैकी १७४..एवढे मतदान झाले.