Payments can now be made through the mobile app | मोबाईल अ‍ॅपद्वारे भरता येणार आता धुळेकरांना कर
Dhule

धुळे : महापालिकेत आतासतास रांगेत उभे राहून मालमत्ता कर भरण्याची धुळेकरांना कर भरण्याची पध्दत साधी व सोपी होण्यासाठी मनपाने आता मोबाईल गर्व्हनन्सकडे वाटचाल करीत धुळे ई- कनेक्ट नावाचे अ‍ॅप सुरू केले आहे़ या प्रणालीव्दारे आता घरबसल्या कर भरता येणार आहे़
मनपाच्या ई-गर्व्हनन्स अंतर्गत विविध संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेल्या आहेत़ मनपाच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता व गतिमानता येण्याच्या दृष्टिकोणातून विविध उपक्रम सुरू केले आहे़ याचाच भाग म्हणून मालमत्ता कर भरणे सुलभ होण्यासाठी राज्यशासनाच्या मोबाईल या धोरणाअंतर्गत अ‍ॅप मनपा मालमत्ताकर विभागाकरीता धुळे ई कनेक्ट नावाचे नवीन मोबाईल अ‍ॅप विकसीत केले आहे़ या अ‍ॅपद्वारे धुळेकरांना मालमत्ता कराची संपुर्ण माहिती पाहता तसेच भरता येवू शकते़ तसेच कर भरल्याची पावती लगेचच अ‍ॅपव्दारे डाऊनलोड करता येवू शकते़ यामुळे या कार्यप्रणालीत पादर्शकता व सुलभता येणार आहे़
असे करा अ‍ॅप डाऊनलोड
नागरिकांनी आपल्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर अ‍ॅपमध्ये धुळे इ कनेक्ट नावाने डाऊनलोड करतांना मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी क्रमांक येईल़ ओटीपी क्रमांक टाकल्यावर अ‍ॅप सुरू होईल़ नागरिकांनी अ‍ॅपव्दारे केलेला भरणा अगदी सुरक्षित राहणार आहे़ अशी माहिती आयुक्त अजिज शेख यांनी दिली़ यावेळी महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले़ नागरिकांनी अ‍ॅपव्दारे भरणाकरून महापालिकेस सहकार्य करावे असे महापौर सोनार यांनी सांगितले़ यावेळी उपमहापौर कल्याणी अंपळकर, सभापती निशा पाटील, उपायुक्त गणेश गिरी, पल्लवी शिरसाठ, विरोधी पक्षनेता साबिर शेख यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते़

Web Title: Payments can now be made through the mobile app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.