सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता द्या : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST2021-08-17T04:41:13+5:302021-08-17T04:41:13+5:30
यावेळी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना ...

सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता द्या : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने
यावेळी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव पाठविले आहेत. भविष्य निर्वाह निधी याेजना लागू कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम अदा करताना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात, थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याच्या रकमेवर १ जुलै २०२० पासून व्याज अनुदेय राहील. राष्ट्रीय निवृत्ती याेजना अथवा परिभाषित अवंशवादी निवृत्ती वेतन याेजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम राेखीने अदा करण्यात यावी, जे कर्मचारी १ जुलै २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील, अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम राेखीने अदा करण्यात यावी, तसेच ३० जूनच्या शासन निर्णयात सुधारणा करावी, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
निदर्शने करताना संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. संजय पाटील, जिल्हाध्यक्ष अशाेक चाैधरी, सरचिटणीस दीपक पाटील, कार्याध्यक्ष सुधीर पाेतदार, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे विभागीय सचिव उज्ज्वल भामरे, अध्यक्ष कल्पेश माळी, सचिव संजय काेकणी, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वाल्मीक चव्हाण, सचिव माेहन कापसे, एस. यू. तायडे उपस्थित होते.