रमाई घरकुल योजनेचा पहिला हप्ता त्वरित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:36 IST2021-07-31T04:36:15+5:302021-07-31T04:36:15+5:30
रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत अनुदानाचा पहिला हप्ता जमा झालेला नाही. हा निधी अखर्चीत पडून आहे. त्यामुळे शासन निधी परत ...

रमाई घरकुल योजनेचा पहिला हप्ता त्वरित द्या
रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत अनुदानाचा पहिला हप्ता जमा झालेला नाही. हा निधी अखर्चीत पडून आहे. त्यामुळे शासन निधी परत जाण्याची भीती असल्याने तो वितरित करावा, अन्यथा ५ ऑगस्टला महापालिकेला घेराव घालून आंदोलनाचा इशारा माता रमाई घरकुल लाभार्थी संघर्ष समितीने दिला आहे. महापालिका क्षेत्रासाठी पात्र लाभार्थींच्या नावांच्या अ, ब, क याप्रमाणे ३ याद्या तयार करण्यात आल्या आहेत. लाभार्थींसाठी शासनाकडून ११ कोटी रुपये अनुदान दीड वर्षापासून महापालिकेच्या बँक खात्यात जमा आहे. पात्र लाभार्थींची निवड होऊन जागेची पाहणी मनपा अभियंत्यांनी केली आहे. ३३७ लाभार्थींचे समाजकल्याण सहायक आयुक्त व पात्र लाभार्थी यांचे संयुक्त बँक खाते उघडण्यात आले आहे. गेल्या ३ वर्षांपासून लाभार्थी अनुदानासाठी मनपा व समाजकल्याण विभागात फेऱ्या मारीत आहे. मात्र, अधिकारी त्रुटी काढून वेळ काढत आहे. शासनाने निधी परत मागितला, तर यास प्रशासनालाच जबाबदार धरण्यात येईल. तरी, याची तीव्रता लक्षात घेत लाभार्थींच्या बँक खात्यावर अनुदानाचा पहिला हप्ता १ लाख २५ हजार अनुदान ७ दिवसांत बँक खात्यावर जमा करावे, अन्यथा घेराव आंदोलन करण्याचा इशारा वाल्मीक दामोदर यांनी दिला आहे.