जयहिंद संस्थेचे पवार यांना ‘संथागार मैत्री’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 22:14 IST2020-02-27T22:13:40+5:302020-02-27T22:14:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : येथील जयहिंद शैक्षणिक संस्थेचे एनसीसी अधिकारी पी़ यू़ पवार यांना शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील जयहिंद शैक्षणिक संस्थेचे एनसीसी अधिकारी पी़ यू़ पवार यांना शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेवून संथागार मैत्री संघाचा ‘संथागार मैत्री’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले़
एसएनडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ विष्णू मगरे यांच्या हस्ते त्यांना नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला़ यावेळी डॉ़ कृष्णमोहन सैंदाणे, संथागार मैत्री संघाचे प्रमुख डॉ़ विलास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती़
पवार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा़ व्ही़ टी़ गवळे, प्रा़ मोहन पावरा, प्रा़ नगराळे, प्रा़ घोडसे, प्रा़ मोरे, प्रा़ उपर्वट, प्रा़ मकासरे, अॅड़ घोडराज, अॅड़ भिसे, भिमराव पवार, सुधाकर पवार, सजंय निकुंबे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे़