शिंगावे कोवीड सेंटर येथे निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून रुग्णांचा दांगडो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 12:14 PM2020-08-07T12:14:17+5:302020-08-07T12:14:42+5:30

रूग्णांनी नाश्त्यावर टाकला बहिष्कार

Patients riot over substandard meals at Shingave Kovid Center | शिंगावे कोवीड सेंटर येथे निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून रुग्णांचा दांगडो

शिंगावे कोवीड सेंटर येथे निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून रुग्णांचा दांगडो

googlenewsNext

धुळे--शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील कोविड सेंटरवर निकृष्ट जेवणावरून रुग्णांनी मैदानात जमून गर्दी करत दांगाडो केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला.
शिरपूर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी शासनाने शिंगावे येथे कोवीड सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी शिरपूर तालुक्यातील कोरणा पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी ठेवले जाते. शासनाने रुग्णांसाठीआयुर्वेदिक काढा, नाश्ता ,दोन टाईम जेवण अशी व्यवस्था केलेली आहे.
यासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत आहे. परंतु शिंगावे येथील सेंटरकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे रुग्णांना निकृष्ट दजार्चे जेवण दिले जाते. नाश्ता ,चहा ,आयुर्वेदिक काढा सकाळी आठ वाजेऐवजी दहा साडेदहा वाजता दिला जातो. तसेच दुपारचं जेवण दीड ते दोन वाजेला दिले जाते. तसेच रात्रीच्या जेवणाचा वेळच नाही. तसेच नाश्ता, जेवण दिले जातात ते एकदम निकृष्ट दर्जाचे दिले जाते. त्यामुळे आज सकाळी रुग्णांचा संताप व्यक्त केला. सकाळी दहा वाजेला नाश्ता आल्यानंतर सगळे रुग्ण मैदानात सोशल डिस्टंसिंग ठेवून जमले होते. रूग्णांनी नाश्त्यावर बहिष्कार टाकत होते . परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांनी विनंती केल्यामुळे नाश्ता घेतला.

Web Title: Patients riot over substandard meals at Shingave Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे