परसोळे ग्रामपंचायतीत झाले सत्तांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST2021-01-23T04:36:27+5:302021-01-23T04:36:27+5:30
तालुक्यातील पश्चिम भागातील शेवटची व तालुक्यातील सर्वात लहान ग्रामपंचायत असून, सात जागांसाठी दोन पॅनलमध्ये येथे सरळ लढत झाली. यात ...

परसोळे ग्रामपंचायतीत झाले सत्तांतर
तालुक्यातील पश्चिम भागातील शेवटची व तालुक्यातील सर्वात लहान ग्रामपंचायत असून, सात जागांसाठी दोन पॅनलमध्ये येथे सरळ लढत झाली. यात परिवर्तन पॅनलला आपले खातेदेखील उघडता आले नाही. ग्राम विकास पॅनलने सर्व सात जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवत ग्रामपंचायतीमध्येदेखील सत्ता परिवर्तन केले आहे.
याआधीच येथे माजी मंत्री नानासाहेब हेमंत देशमुख गटाची सत्ता होती. यात परिवर्तन करत विद्यमान आमदार जयकुमार रावल यांच्या गटाकडे मतदारांनी कौल दिला आहे. यासाठी एम. एस पाटील यांचे कसब कामी आले.
विजयी उमेदवार-कोकिळाबाई मोहन पाटील, मनोज भटु पाटील, माया राजू सोनवणे, प्रिया संदीप पाटील, कपिल दादाभाऊ सोनवणे, संजय साहेबराव पाटील, सुनीता खंडू पाटील यांचा समावेश आहे.