विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याने पालकांनी केला संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 23:15 IST2019-12-02T23:15:20+5:302019-12-02T23:15:52+5:30

पिंपळनेर : एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलबाबत वाढल्या तक्रारी, प्रभारी प्राचार्य तडकाफडकी निलंबित

Parents are upset because students are not getting facilities | विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याने पालकांनी केला संताप

विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याने पालकांनी केला संताप

पिंपळनेर :  येथील एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांना सोयीसुविधा योग्य पद्धतीने मिळत नसल्याने पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलन सुरू केले़ एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय धुळे येथील अधिकाºयांनी या घटनेची गांभिर्याने दखल घेतली़ प्रकल्पाधिकारी राजाराम हळपे यांनी संस्थेचे प्रभारी प्राचार्य डी़ आऱ सोनवणे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे़  
एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल या शाळेत आदिवासी समाजाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय या माध्यमातून सदरील शाळा सुरु करण्यात आली़ शाळेचा कारभार सुरुवातीपासूनच  वादात आहे़ याठिकाणी पिंपळनेर परिसरातील तसेच बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थी शिकण्यासाठी इयत्ता पहिली ते दुसरी व सहावी ते दहावी पर्यंतचे मुलं व मुली शिक्षण घेत असल्याने या ठिकाणी त्यांना योग्य शिक्षण मिळत नाही, पूर्ण पाठ्यपुस्तके देण्यात आलेली नाही, शालेय विद्यार्थ्यांना मिळत असलेले भोजन हे योग्य दर्जाचे नाही़ एक ना अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आज याठिकाणी पालकांना आंदोलन करावे लागेल. दुपारी पालकांनी या ठिकाणी येऊन आंदोलन केले़ समस्यांचा पालकांनी पाढा वाचला़ परिणामी काही काळ वातावरण तणावपुर्ण झाले होते़ एकात्मिक विकास आदिवासी प्रकल्प कार्यालयातून अधिकारी येत नाही तोपर्यंत सदर आंदोलन हे मागे घेतले जाणार नाही असे पालकांनी भूमिका घेतली होती़ यावरून घटनेची माहिती आमदार मंजुळा गावित, सहायक प्रकल्पाधिकारी पी़ आऱ देसले, शिक्षण विस्तार अधिकारी सी. बी. साळुंके घटनास्थळी दाखल झाले़ 
विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सोई-सुविधा मिळत नाही़ पाठ्यपुस्तके मिळत नाही़ वसतिगृहात अस्वच्छता आहे़ यासाठी आंदोलन केले आहे़ 
- बाबू राऊत, उंभर पाटा
विद्यार्थ्यांना योग्य दर्जाचे जेवण मिळत नाही़ मुलींच्या सुरक्षिततेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाही़ आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते़  
- सुरेश बहिरम, केवडीपाडा

Web Title: Parents are upset because students are not getting facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे