चर्मकार महामंडळाचे कर्ज माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:27 IST2020-02-25T23:27:26+5:302020-02-25T23:27:51+5:30
चर्मकार महासंघ : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने लाभार्थ्यांना दिलेले कर्ज माफ करावे, नविन कर्ज उपलब्ध करावे, महामंडळात कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, गटई स्टॉलच्या अटी शिथील कराव्या यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने मंगळवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले़
१८ जुनच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने मुख्यमंत्र्यांसह सामाजिक न्याय मंत्री, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त, महामंडळाचे विभागीय अधिकारी यांना निवेदनाच्या प्रति पाठविल्या आहेत़ गेल्या दोन वर्षातील दुष्काळाचा फटका चर्मकार बांधवांनाही बसला असल्याचे निवेदनात म्हटले आहे़
निवेदनावर उत्तर महाराष्ट्र सचिव भिवसन अहिरे, जिल्हाध्यक्ष दिनेश महाले, युवा अध्यक्ष भटू कानडे, श्रावण होलार, विजय धुर्मेकर, पांडुरंग वानखेडकर, प्रल्हाद चत्रे, रामेश्वर चत्रे, मुन्ना जपसरे, कन्हैय्या साखरे, जयप्रकाश धुर्मेकर, प्रभाकर मोरे, रवींद्र चत्रे, पापालाल जाधव, शाम जाधव आदींच्या सह्या आहेत़