शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाच म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
3
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
4
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
5
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
6
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
7
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
8
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
9
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
11
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
12
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
13
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
14
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
15
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
16
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
17
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
18
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
19
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
20
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."

पंचवटीमधील महिलेला गंडविले संमोहीत करुन दागिने केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 22:53 IST

दीड लाखांचा ऐवज : दोन ठगांचा प्रताप, सावधानतेचा इशारा

धुळे : देवपुरातील पंचवटी भागात दोन ठगांनी मंदिरातील पुजारी महिलेला तब्बल दीड लाखांत ठगविले़ या महिलेला संमोहित करुन अंगावरील आणि घरातील असे एकूण दीड लाख रुपये किंमतीचे ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेले़ ही घटना गजबजलेल्या वस्तीत आणि सकाळच्यावेळेस घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ पंचवटी भागात राहणाºया सुनंदाबाई मोहन गोसावी या घरी सकाळी देवाची पुजा करीत होत्या़ त्याचवेळेस दोन अज्ञात व्यक्ती आले़ त्यांनी मंदिरात पैसे दान करायचे असे सांगून बॅगेतून नोटांचे बंडल काढले़ यावेळी पैशांची बॅग उघडताच सुनंदाबाई यांची शुध्द हरपली़  यानंतर दोघा ठगांनी जसे सांगितले त्याप्रमाणे सुनंदाबाई यांनी केल्याचा संशय आहे़ सुनंदाबाई यांनी अंगावरील आणि घरातील पेटीत ठेवलेले तब्बल ३६ ग्रॅम वजनाचे दीड लाख रुपये किंमतीचे दागिने काढून दिले़ यानंतर क्षणार्धात या दोघा ठगांनी दागिने घेऊन धूम ठोकली़ घटनेनंतर काही वेळाने शुध्द आल्याने सुनंदाबाई यांनी घरातून बाहेर धाव घेतली़ आरडाओरड केला़ मात्र तो पर्यंत दोघेही ठग पसार झाले होते़ या दोघा ठगांचे छायाचित्र एका दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे़ याप्रकरणी सुनंदाबाई गोसावी यांच्या फिर्यादीवरुन देवपुर पोलिसात दोन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे या दोघा ठगांचा शोध घेत आहे़ दरम्यान, दोघे ठग हे सकाळी पंचवटी परिसरात आले़ तेव्हा एक पाटील आजी घराच्या ओट्यावर बसलेल्या होत्या़ त्या आजीबाईच्या अंगावरील सोन्याचे दागिने बघून हे दोघे ठग त्याठिकाणी थांबले़ त्यांचा इरादा हा आजीबाईच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करण्याचा होता़ परंतु घरातून त्यांची सून आल्याने दोघा ठगांचा मनसुबा उधळला गेला़ आपली पोल उघडू नये यासाठी दोघांनी तात्काळ आपला प्लॅन बदलला असावा असा अंदाज आहे़ आम्हाला पैसे दान करायचे आहेत असे सांगून त्यांनी महिला पुजारी सुनंदाबाई यांचे घर गाठले आणि त्यांना ठगविले़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी