धुळ्यात मंडप व्यावसायिकाची गळफासाने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 11:33 IST2018-01-11T11:28:46+5:302018-01-11T11:33:21+5:30

मोगलाई : सकाळी उघडकीस आली घटना

Pamphlet in Dhule commits suicide by a businessman | धुळ्यात मंडप व्यावसायिकाची गळफासाने आत्महत्या

धुळ्यात मंडप व्यावसायिकाची गळफासाने आत्महत्या

ठळक मुद्देमंडप व्यावसायिकाने केली आत्महत्यागुरुवारी सकाळी उघडकीस आली घटनाघराजवळ बघ्यांची झाली होती गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील मोगलाई भागात राहणाºया मंडप व्यावसायिक तरुणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली़ गुरुवारी सकाळी ही बाब लक्षात आली़ बघ्यांची यावेळी गर्दी झाली होती़ 
साक्री रोडवर मोगलाई परिसरात परिचित असा देशमुख वाडा आहे़ या वाड्यात श्रीकांत सुर्यवंशी (अंदाजे वय ३५) हे आपल्या परिवारासोबत राहतात़ त्यांना पत्नी, १ मुलगा आणि १ मुलगी आहे़ त्यांचा स्वत:चा मंडप व्यवसाय आहे़ बुधवारी नेहमीप्रमाणे त्यांनी दैनंदिन कामही केले़ गुरुवारी मात्र ते गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळले़ त्यांनी राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली़ 
यावेळी त्यांची पत्नी कुठे होती? गळफास घेतला तेव्हा कोणाला समजले का नाही? रात्री त्यांनी केव्हा गळफास घेतला असावा, अशा विविध प्रश्नांची उत्तरे अद्यापही अनुत्तरीत आहेत़ 
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली होती़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते़ घटनेचा पुढील तपास सुरु आहे़ 

Web Title: Pamphlet in Dhule commits suicide by a businessman