मेहनतीने तयार केलेले गाणे डिलीट केल्याचं दु;ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 22:50 IST2020-02-02T22:48:59+5:302020-02-02T22:50:21+5:30

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क साक्री तालुक्यातील माळमाथ्यावर जावून पत्त्नीसोबत अनेक मराठी चित्रपटांची गाणे तयार केली़ चार ते ...

The pain of deleting a hard-working song | मेहनतीने तयार केलेले गाणे डिलीट केल्याचं दु;ख

Dhule

ठळक मुद्देकला असूनही व्यासपीठ नाहीजोडप्याची कमाल नुसती धम्मालअभिनयाची आवड होती़ मात्र अभिनय करण्याची लाज वाटत होती़



चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री तालुक्यातील माळमाथ्यावर जावून पत्त्नीसोबत अनेक मराठी चित्रपटांची गाणे तयार केली़ चार ते पाच लाख लोकांनी या गाण्यांना भरभरून प्रतिसाद दिला़ मात्र प्रसिध्द मिळत असतांना सोशल मिडीयातील काही माध्यमावर आता गाणे तयार करून अपलोड करतो़ त्याचे व्युज थांबवून गाणे डिलीट केले जाते़ त्यामुळे मेहनतीने तयार केलेले गाण्याचा उपयोग होत नसल्याचे दु:ख वाटते़ अशी व्यथा साक्री तालुक्यातील जामोदे येथील टिकटॉक अभिनेता दिनेश पावरा यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले़
प्रश्न : गाणे तयार करण्याची प्रेरणा तुम्हाला कोणापासून मिळाली ?
पवार : अभिनयाची आवड होती़ मात्र अभिनय करण्याची लाज वाटत होती़ कोणतेही व्यासपीठ नसल्याने मित्राने मला टिक-टॉक अ‍ॅपवर गाणे तयार करण्याचा सल्ला दिला़ त्यानुसार निजामपूर भागात पहिल्या पत्नीसोबत मराठी गाण्यावर नृत्य केले़ व अपलोड झाल्यानंतर प्रसिध्द मिळत गेल्याने मी हिरो झाला़
प्रश्न : आतापर्यत तुम्ही किती गाणे तयार केले आहेत़
पवार : जामदे व निजामपूर शेत शिवारात तयार केलेले आतापर्यत १२७ मराठी चित्रपटांचे गाणे विगो व टिकटॉक अ‍ॅपवर अपलोड केले आहे़ या गाण्याची अनेकांनी चेष्टा केली़ तरीही या गाण्याला मोठया प्रमाणात प्रसिध्द मिळत गेली़ त्यानंतर अभिनेत्री रविना टंडन यांनी माझ्या गाण्याला लाईक केल्यानंतर फॉलोव्हर्स संख्येत वाढ झाली़
प्रश्न : अभिनयाला दोन्ही बायकांनी केलेल्या नृत्य विषयी काय सांगाल?
पवार : माझ्या १२७ गाण्यातील अभिनय दोन्ही बायकांसोबत नृत्य केले आहे़ दोन्हींना नृत्यांची समान संधी व समान प्रसिध्दी मिळत आहे़ गाणे तयार करतांना दोन्ही जण सोबत असतात एक अभिनय जेव्हा करत असते़ तेव्ही दुसरी तिच्या प्रसिध्दीसाठी त्या गाण्याची शुटींग करते़ त्यामुळे दोन्हीही बायका माझ्या प्रसिध्दी व संसाराची चाके आहेत़
जोडप्याची कमाल नुसती धम्माल
जामदे येथील शेतातील झोपडीत घरात राहत असलेले दिनेश पवार व लखाणी पवार या जोडप्याच्या धडपडीला दाद द्यावी लागेल. दिनेश यांचे प्राथमिक शिक्षण झाले असून त्यांच्या पत्नी लखाणी या अशिक्षित आहे. या दांपत्याचा व्यवसाय शेती आहे तर यांना रश्मी आणि शिवम अशी दोन मुले आहेत़
कला असूनही व्यासपीठ नाही
पत्नीसोबत अनेक गाणे तयार केले आहे़ सोशल मिडीयाच्या माध्यमातून कला, संस्कृती व कुंटूबाची बदनामी देखील होऊ नये याचीही दक्षता घेतली जाते़ प्रसिध्दी मिळाल्यानंतर अनेक कलावंत,अभिनेते, डायरेक्ट यांनी भेट घेऊन चित्रपटात काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली मात्र अद्याप त्यांची प्रतिक्षा लागून असल्याचे पवार यांनी सांगितले़

Web Title: The pain of deleting a hard-working song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे