जळगाव : दोन वेळा लिलाव करूनही बोली न मिळालेल्या जिल्ातील २५ वाळू गटांची किंमत २५ टक्क्याने कमी करण्यास विभागीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही किंमत २१ कोटी २९ लाख ७३ हजार ५७१ वरून १५ कोटी ९७ लाख ३० हजार १७८वर आली आहे. ...
जळगाव: कार्यालयात दैनंदिन काम करत असताना फिट आल्याने कॅबीनवर कोसळल्याने वसंत जयवंत सुरळकर (वय २८ रा.कुंभारी खुर्द ता.जामनेर) या तरुणाची काच घुसून मान कापली गेली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमधील श्री स्वामी स ...
धडगाव : येथील नगरपंचायतीच्या पहिल्या अध्यक्षा होण्याचा मान काँग्रेसच्या अहिल्याबाई इंद्रसिंग पावरा यांना मिळाला, तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचेच मतीन शेख निवडून आले. ...
जळगाव : शासन निर्णयानुसार खान्देशातील २ हजार ७५७ टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करावे, असे पत्र उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांना दिले आहे. ...
जळगाव- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा या वर्षाचा दुसरा टप्पा २१ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील चार लाख १९ हजार ३४ बालकांना पल्स पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट्य आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक ...
जळगाव : जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालक मंडळाची पदाधिकारी निवडीसाठी मंगळवारी बैठक झाली. सभेत जि.प.सदस्य गोपाळ देवकर यांची सभापतीपदी तर प्रकाश एकनाथ पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ...
नशिराबाद : गेल्या दीड महिन्यापासून पाणी टंचाईने हैराण असलेल्या नशिराबादकरांना अखेर एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आठ ते दहा दिवसानंतर मिळणारे पाणी आता चौथ्या-पाचव्या दिवशी मिळू शकेल. ...
जळगाव : महापालिकेतील मृत कर्मचार्यांच्या वारसांच्या कुटुंबीयांनी सोमवारी महापालिकेत येऊन सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली. यात महिला व मृतांच्या मुला-मुलांची समावेश होता. ...