पडळकरांच्या विधानाचे जिल्ह्यात तीव्र पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 21:11 IST2020-06-25T21:10:36+5:302020-06-25T21:11:29+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस : जोडे मारो आंदोलन, प्रतिमा दहन करुन निषेध

Padalkar's statement has severe repercussions in the district | पडळकरांच्या विधानाचे जिल्ह्यात तीव्र पडसाद

dhule

धुळे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचे धुळ्यात तीव्र पडसाद उमटले़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा दहन करत निषेध व्यक्त केला़
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण पाटील, धुळे शहर जिल्हाध्यद्व रणजीतराजे भोसले, कार्याध्यक्ष नवाब बेग, तालुकाध्यक्ष राजेंद्र चितोडकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, धुळे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष भोला सैंदाणे, युवक जिल्हाध्यक्ष जितू पाटील, सुमीत पवार, बंटी वाघ, निरज पाटील, डॉ़ अनिल पाटील, सागर पाटील, कमलाकर पाटील आदींनी पडकळकरांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून भविष्यात असे विधान केल्यास प्रतिमेला जोडे मारण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करण्याचा इशारा दिला आहे़ पडळकरांनी जाहीर माफी मागितली नाही तर त्यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे़
दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसने देखील शहरातील कमलाबाई शाळा चौकात पडळकरांच्या प्रतिमेचे दहन केले़
इरशाद जहागिरदार, कैलास चौधरी, सत्यजित सिसोदे, जया साळुंखे, शकीला बक्श, सागर चौगुले, प्रमोद साळुंखे, एजाज खाटीक, जमीर शेख, वसीम मन्सुरी, निखील पाटील, राजदिप काकडे, सद्दाम खान, एजाज शेख, रोहित सुडके, संदीप पाटील, भूषण पाटील, आरीफ मुजावर आदी उपस्थित होते़ पडळकरांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही, असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे़
शिंदखेड्यात शिवसेनेतर्फे निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले म्हणून शिंदखेडा येथे पडळकरांच्या प्रतिमेचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला़
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाºयांनी शिवाजी चौकात घोषणाबाजी करुन संतप्त भावना व्यक्त केल्या़
यावेळी डॉ. कैलास ठाकरे, ललित वारुडे, आधार पाटील, प्रविण पवार, दिपक जगताप, कमलाकर बागले, निलेश पाटील, दुर्गेश पाटील, संदीप पाटील, राम ठाकरे, इरफान खाटीक, रहिम खाटीक, गोपी पवार, राजेंद्र पाटील, राकेश देसले, राधेश्याम पाटोळे यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते़
निमगुळलाही जाळली प्रतिमा
निमगुळ : शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी बस स्थानक परिसरात पडळकर यांचा फोटो जाळून निषेध केला़ यावेळी प्रदिप बागल, भोला बागल, आशिष बागल, वसंत पवार, जगदीश बागल, गुलाब बिल, प्रदिप बागल, चिंतामण सैंदाणे आदी उपस्थितीत होते़

Web Title: Padalkar's statement has severe repercussions in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे