संस्थेचे संचालक तथा महाविद्यालय विकास समिती चेअरमन प्रा. सुधीर पाटील आणि चर्चचे फादर सागर कालू यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, फादर नीलेश वळवी, प्राचार्य जेनिफर कालू, चर्च परिसर व्यवस्थापक विजय चोपडे, उपप्राचार्य प्रा. व्ही. एस. पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, उपप्राचार्य प्रा. व्ही. एस. पवार, डॉ. डी. के. पाटील व डॉ. वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक वाहिनी संयोजक प्रा. डॉ. प्रवीणसिंग गिरासे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत कसबे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योगिता पाटील, साहाय्य कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रतीक शिंदे, स्वयंसेवक नयन पाटील, महेश कलाल, पंकज बोरसे, कोमल तुपे, मिताली सोनार, कुमकम पाटील, राणी अहिरे, गौतमी जगदेव, गोरख माळी, प्रेम वाकळे यांनी परिश्रम घेतले.