कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST2021-06-03T04:25:42+5:302021-06-03T04:25:42+5:30
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अर्जुन टिळे यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. तडवी व सहकारी ...

कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अर्जुन टिळे यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. तडवी व सहकारी यांच्या ते सुपुर्द करण्यात आले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, चिटणीस सुरेश सोनवणे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, पंचायत समितीचे उपसभापती ॲड. नरेंद्र मराठे, तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित शिसो, सरचिटणीस प्रा. नरेंद्र तोरवणे, जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, जयेश साळुंके, विधानसभा क्षेत्रप्रमुख विलास देसले, रोहिणी कुवर, गिरीश नेरकर, विजय बागूल, ॲड. वाय.पी. कासार, ॲड. सुनील नांद्रे, करीम शहा आदी याप्रसंगी उपस्थित होते.
संदीप बेडसे यांच्या प्रयत्नाने मुकुल माधव ट्रस्ट, मुंबई आणि फिनोलेक्स पाइप यांच्यातर्फे तालुक्यातील रुग्णांसाठी दहा लिटर क्षमतेचे पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून भेट देण्यात आले.