भाजपतर्फे ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका मोफत; कोरोना रुग्णांना दिलासा : खासदारांच्या हस्ते झाले लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST2021-05-12T04:37:01+5:302021-05-12T04:37:01+5:30
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर काही रुग्णवाहिकांनी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक केल्याची उदाहरणे समोर आली. त्यामुळे कोरोनाच्या ...

भाजपतर्फे ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका मोफत; कोरोना रुग्णांना दिलासा : खासदारांच्या हस्ते झाले लोकार्पण
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर काही रुग्णवाहिकांनी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक केल्याची उदाहरणे समोर आली. त्यामुळे कोरोनाच्या आपत्तीमध्ये रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेची मोफत सेवा देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. यासाठी अनुप अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन पदरमोड करीत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. गरजू रुग्णांना मोफत सेवा दिली जाणार आहे.
याबाबत अनुप अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात काही रुग्णवाहिका मालक आणि चालकांकडून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. तरीही रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे पदरमोड करून मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. गरजू रुग्णांनी भाजप कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याला उपमहापाैर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती संजय जाधव, सभागृह नेते राजेश पवार, विजय पाच्छापूरकर, यशवंत येवलेकर, चंद्रकांत गुजराथी, ओम खंडेलवाल, हर्षकुमार रेलन, युवराज पाटील, हिरामण गवळी, भगवान गवळी, नरेश चाैधरी, विक्की परदेशी, दिनेश बागुल, अजय अग्रवाल, मोहन टकले, अमोल धामणे आदी उपस्थित होते.