अल्पवयीन मोलकरणीवर मालकाने केला अत्याचार
By Admin | Updated: January 25, 2017 00:28 IST2017-01-25T00:28:23+5:302017-01-25T00:28:23+5:30
धक्कादायक : संशयित आरोपी सिद्धेश्वर आचार्यला केली अटक

अल्पवयीन मोलकरणीवर मालकाने केला अत्याचार
शिरपूर : शहरातील व्यंकटेश नगरातील एका प्राध्यापिकेच्या घरात घरकामासाठी असलेल्या अल्पवयीन मोलकरणीवर त्या प्राध्यापिकेच्या पतीनेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. संबंधित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर आचार्य यास शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे.
सिद्धेश्वर श्रीनारायण आचार्य यांचे करवंद नाक्याजवळील मांडळ शिवारात व्यंकटेशनगरात घर आह़े त्यांनी काही वर्षापूर्वी घरकामासाठी आदिवासी कुटुंबाला ठेवले होत़े त्या कुटुंबात एक अल्पवयीन मुलगीही होती.
दरम्यान, दीड वर्षापूर्वी प्राध्यापिका गावाला गेल्यानंतर सिद्धेश्वर याने संधी साधून अत्याचार केल्याचे त्या अल्पवयीन मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.
पीडित तरुणी जळगावात
आचार्य याच्याकडून होणा:या अत्याचाराला कंटाळून संबंधित पीडित युवती जळगांव येथे आचार्याच्या मेहुण्याकडे निघून गेली होती़ ही बाब सिद्धेश्वरला समजली.
त्यानंतर ते तिला घेण्यासाठी जळगावकडे निघाले. मात्र, यासंदर्भात त्या युवतीला कळताच ती तेथून पसार झाली़ जवळील एका महिलेला तिने हकिकत सांगितली़
महिला दक्षता समितीसमोर जबाब
त्यानंतर ही तरुणी शिरपूर येथे आल्यानंतर तिने महिला दक्षता समिती सदस्यांसमोर जबाब दिला. त्यानुसार संशयित आरोपी सिद्धेश्वर आचार्य विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 376 (2) (एफ) 2 (आय) 2 (एन), 293 सह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 चे कलम 4 व 6 तसेच गुन्हा नोंदविण्यात आला आह़े